** निवेदन **

** निवेदन **

आयुर्वेद पत्रिका या मासिकाचा ७०वा वर्धापन दिन सोमवार दि. १८ जुलै २०१६ रोजी साजरा करण्याचे निश्चित केले आहे, त्यानिमित्त वैद्य प्रभु न.भो.डोंबिवली यांचे ‘औषधी कल्प’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच कै.वैद्य श्री.कृ.करमरकर यांच्या ‘चिकित्सा नवनीत’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद महाविद्यालय, नाशिक येथे ठीक दुपारी ३:३० वाजता आहे. आयुर्वेद पत्रिकेच्या हितचिंतकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही विनंती.

– संपादक, आयुर्वेद पत्रिका, नाशिक